सर्वोत्तम आरोग्य सेवा
ऑफलाइन सेवा.
होमिओपॅथिक चा शोध जर्मन चे डॉ. सॅम्युअल हैनीमैन यांनी 1769 साली लावला.
ते स्वतः ॲलोपॅथिक मध्ये M D physician होते. त्या काळीं त्यांना cincona oppaiolis चा उपयोग मलेरिया मध्ये होतो हे
लक्षात आले. त्यांनी स्वतः ते घेतल्यावर मलेरिया ची लक्षणे जाणवू लागली. परत त्यांनी त्याच औषदाची मात्रा घेतल्यावर
त्रास कमी झाला आणि त्यांच्या असे लक्षात आले औषध घेतल्यावर लक्षणे येतात तर तेच तेच औषध घेतल्यावर लक्षणे
जातात सुद्धा .
मुतखडा कसा होतो?
कामाच्या गडबडीत तर कधी दुर्लक्षामुळे तासनतास पाणी पिण्याचे लक्षात येत नाही. मग अचानक ओटीपोट किंवा पाठीत दुखायला लागते. निदान झाल्यानंतर मुतखडा झाल्याचे लक्षात येते.
का होतो मुतखडा, त्याची लक्षणे कोणती, जाणून घेऊया मुतखड्याविषयी….
मुतखडा हा अतीव यातना देणारा रोग आहे. मुतखड्याचा असह्य वेदना साठी होमिओपॅथी औषध खूप चांगली काम करतात , पुन्हा-पुन्हा मुतखडा होऊ नये, यासाठी होमिओपॅथीक औषधे अधिक गुणकारी असतात.
मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.
मुतखडा तयार होण्याचा धोका असणारे…
– ८०% रुग्ण पुरुष असतात.
– वारंवार लघवीचा जंतुसंसर्ग होणारे रुग्ण
– २० ते ४९ वर्षांच्या व्यक्ती
– कुटुंबातील लोकांना मुतखडा होण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्ती
– ज्या व्यक्तींमध्ये रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.
– गर्भारपणात प्रोजेस्टेरॉनचा स्राव वाढल्याने लघवीचा वेग कमी होतो, त्याने खडे तयार होतात.
– गर्भारपणात कॅल्शियम मूत्रात उत्सर्जित होण्याने मुतखडे होण्याचे प्रमाण वाढते. मुतखडा तयार होण्याची प्रकिया
– लघवीचे प्रमाण कमी झाल्याने किंवा लघवीतील मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.
– पाणी अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने किंवा श्रम, व्यायाम, जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होण्याचे प्रमाण वाढते.
– मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते.
मुतखड्याचे प्रकार
– कॅल्शियमचे- कॅल्शियम पासून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे किंवा कॅल्शियम फॉस्फेटचे खडे तयार होतात.
– रक्तातील व लघवीतील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडचे मुतखडे तयार होतात.
लक्षणे
– सामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
– मुतखडा मूत्राशयाच्या जवळ पोहचल्यावर लघवी पुन्हा-पुन्हा आल्याची संवेदना होते किंवा लघवी होताना जळजळ झाल्याची जाणीव होते.
– यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास ताप व थंडी वाजून येते. तपासणीच्या पद्धती
– लघवीची तपासणी करणे, त्यात लघवीतील रक्तपेशी व जंतूंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
– सोनोग्राफी केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान समजते. सोनोग्राफीमुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडनीला त्याचा कितपत त्रास आहे, या सर्वांची उत्तरे मिळतात. रक्त तपासून किडनीचे कार्य कमी झालेले नाहीना, हे तपासावे लागते.
– पोटाच्या क्ष-किरण तपासणीमध्ये मुतखड्याचे आकारमान व घनता जाणता येते.
–
मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?
– पाणी भरपूर पिणे.
– लघवी तुंबवून न ठेवणे.
– काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून त्याप्रमाणे पथ्य करावे.
एक महत्त्वाची गोष्ट. काही मुतखडे निदान झाल्या झाल्या लगेच औषधे घ्यावी लागतात. काही मुतखडे एकाद-दुसरा महिना थांबले तरी त्रास देत नाहीत. पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले का? हे अधुनमधून बघावे लागते. तर काहींना काही करावे लागत नाही. या सगळ्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो.
आपल्या होमिओपॅथीक औषध 18 ते 20 mm चे मुतखडे विरघळून जातात, ऑपेरेशन करायची गरज पडत नाही
अंगावरून रक्तस्राव
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे
मासिक पाळी
ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते
मासिक पाळीच्या तक्रारी
मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात – अगदी छोट्या व किरकोळ समस्यांपासून दीर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत. अशा विविध तक्रारींची माहिती येथे दिली आहे.
महिलांचे आजार
अंगावर गांधी उठणे – पथ्य
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प्रमाणात आढळून येते.
अंगावरून रक्तस्राव
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे योग्य निदान करणे आवश्यक आहे.
ओटीपोटात सूज
स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोट म्हणजे गर्भाशय,गर्भनलिका, स्त्रीबीजांडे व आजूबाजूचा भाग (स्नायू,इत्यादी).
गर्भाशय बाहेर पडणे
गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्रार मध्यम वयानंतर पण विशेषतः उतारवयातील स्त्रियांमध्ये आढळते.
गर्भाशयाच्या गाठी
गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात.
गर्भाशयाच्या तोंडाची सूज
या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपासल्यावर गर्भाशयाच्या तोंडाचा भाग खरबरीत लालसर व सुजलेला दिसतो.
जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग
जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात.
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग
प्रसुतीपश्चात जंतुसंसर्ग प्रसुतीशी थेट (गर्भाशयामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या भागामध्ये) किंवा अप्रत्यक्षपणे (मुत्राशय, स्वादुपिंड, स्तन किंवा फुफ्फुसामध्ये) संबंधित असू शकतात.
बीजांडाच्या गाठी
बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान असेल तर ओटीपोटात एक बाजूला लागते.
महिला शेतकरी आरोग्याला जपा
शेतीत काम करणाऱ्या महिला शेतकरी, मजूर महिलांच्या आरोग्याविषयी सांगायचे झाले तर त्यांना दुखणी आली तरी त्या काम करतच असतात*
मासिक पाळी
ऋतुस्त्राव म्हणजे गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) बाहेर टाकले जाण्याची क्रिया होय. ह्या सह रक्तदेखील वाहते. प्रत्येक स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षम जीवनकाळात, गरोदरपणाचा काळ वगळतां, साधारण दर महिन्यास हे चक्र येते.
मासिक पाळी – वेदनेतून सुटका
प्रायमरी डिस्मेनोरिया अर्थात मासिक पाळी सुरू होण्याच्या काळातील मुलींच्या पोटदुखीवर आहे.
मासिक पाळीच्या तक्रारी
मासिक पाळीशी संबंधित विविध प्रकारच्या तक्रारी असू शकतात – अगदी छोट्या व किरकोळ समस्यांपासून दीर्घकाळच्या कटकटी आणि आजारपणापर्यंत. अशा विविध तक्रारींची माहिती येथे दिली आहे.
मासिक पाळीच्या समस्या
पाळी ही जरी सामान्य शारीरिक घटना असली तरी पाळीच्या संबंधात अनेक तक्रारी असतात.
योनिदाह
योनिदाह म्हणजे योनिमार्गाच्या आतल्या नाजूक त्वचेचा दाह. योनिदाहाची कारणे अनेक आहेत.
योनिद्वाराची खाज
योनिद्वारावर खाज सुटण्याची कारणे अनेक असतात.
वंध्यत्व
गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात.वंध्यत्व हा पुनरुत्पादक यंत्रणेचा रोग असून त्यामुळे शरीराचं सर्वात मूलभूत कार्य – मूल जन्माला घालणं – हरवून बसतं.
वंध्यत्व
एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्ये जीवशास्त्रीय दोष असू शकतो.
वंध्यत्व
योग्य वयोगटातील व मुले होण्याची इच्छा असलेल्या सर्व जोडप्यांपैकी सु. ८ ते १०% जोडप्यांत वंध्यत्व ही तक्रार आढळते आणि इतर १० ते १२% जोडप्यांना इच्छा असूनही एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ शकत नाहीत.
वंध्यत्व तपासणी
वंध्यत्वावर उपचार करताना त्या जोडप्याची खूप मानसिक पूर्वतयारी लागते.
श्वेतप्रदर (पांढरे पाणी जाणे
पांढरे पाणी जाणे हे एक लक्षण आहे. प्रदर म्हणजे अंगावरून जाणे. श्वेत म्हणजे पांढरे. श्वेतप्रदर म्हणजे अंगावरून पांढरे पाणी जाणे.
स्तनांचे आजार
स्तनपान चालू असताना स्तनात अशा गाठी व जंतुदोष होऊ शकतो.
स्त्री आरोग्य गरज समुपदेशनाची
स्त्रीजननसंस्था आजार व होमिओपॅथी
स्त्रीजननसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये होमिओपॅथीक औषध उपयुक्त ठरतो.
*स्त्रीजननसंस्था व मासिक पाळी
स्त्रियांचेआरोग्य आणि आजार हा एक महत्त्वाचा विषय आहे
केस गळती –
आजकाल केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे. केस गळतीचे मुख्य कारण चुकीचा आहार, खराब जीवनशैली आहे. परंतु कधीकधी फॅशन आणि स्टाईलच्या नादात देखील केस गळतीची समस्या निर्माण होते. सुरूवातील केस गळतीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जेंव्हा केस गळती जास्त होते, त्यावेळी केस गळती रोखण्यासाठी आपण उपाय करतो. (These are the main causes of hair loss)
-आपण आपले केस जितके नैसर्गिक ठेवता तितके चांगले आहे. पण स्टायलिश दिसण्यासाठी मुली अनेक प्रयोग केसांवर करतात. केस मऊ करणे, सरळ करणे, केराटीन ट्रीटमेंट इ. हे सर्व करण्यासाठी केसांवर विविध रसायने वापरली जातात. यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात.
-फॅशनमुळे अनेकजण केसांना तेल लावत नाही. परंतु लक्षात ठेवा ज्याप्रमाणे आपल्याला पोट भरण्यासाठी खाण्याची गरज असते त्याचप्रमाणे केसांनाही वेळोवेळी तेलाची आवश्यकता असते. यामुळे केसांना पोषण मिळते. केसांना तेल न लावल्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात.
-तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.
-केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.
-काही जण सर्दी, पडसं, अंगदुखी यासारख्या छोट्या छोट्या दुखण्यासाठी गोळ्या खातात. गोळ्यांच्या अतिसेवन केल्यानेही केस गळतीचे प्रमाण वाढते. तणाव, हृदयासंबंधीचे आजार, उच्च रक्तदाब या गोळ्यांच्या सेवनाने केस गळतीच्या समस्या वाढतात.
नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.
अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात
लक्षणे हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)
उपचार
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. – (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे सुरुवातीला आग होते, पणहोमिओपॅथीक औषध ने दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर काही आठवडे तरी औषध घ्यावे लागेल . नाही तर नायटा परत उमटतो. पण तुम्ही होमिओपॅथी औषध चा डोस पूर्ण केल्यावर परत फंगल इन्फेकशन होत नाही माझ्या बऱ्याच पेशंट चा अनुभव आहे
उपचार
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
-जागेची स्वच्छता ठेवणे
-2 वेळा अंघोळ करणे
पांढरे डाग, कोड याची कारणे, लक्षणे
काही व्यक्तींमध्ये कुठल्यातरी अज्ञान कारणामुळे त्वचेच्या या पेशींना मारणाऱ्या अॅंटीबाॅडी तयार होतात व त्या मेलॅनीनच्या पेशींना निष्क्रिय किंवा नष्ट करतात. ज्या जागेवर ही प्रक्रिया होते त्या जागेवर पांढरा चट्टा उमटतो. ज्याला आपण कोड म्हणतो. 15 ते 20 टक्के व्यक्तींमध्ये कोड असतो
पांढरे डाग याला ल्युकोडेर्मा किंवा कोड म्हणून ओळखले जातं.
हा एक विकार आहे ज्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागांतल्या त्वचेवर पांढरे डाग दिसतात.
त्वचेतील रंगद्रव्य पेशी काहीवेळा नष्ट होतात, या पेशींना मेलॅनोसाइट म्हणतात, त्यांच्या कमतरतेमुळे हे पांढरे डाग निर्माण होतात.
पांढरे डाग नाकाच्या आणि तोंडाच्या आतल्या भागांवर तसंच डोळ्यांवर सुद्धा परिणाम करतात.
पांढऱ्या डागांची चिन्हं किंवा लक्षणं म्हणजे त्वचेचा रंग मंदावणे किंवा पांढरा होणे, शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेवर डाग येणे ही आहेत
हे पांढरे डाग काही वेळा शरीराच्या एका भागावर दिसतात तर काही वेळा शरीराच्या वेगवेगळ्या भागात किंवा काही वेळा संपूर्ण शरीरभर पसरतात.
शरीरावर पांढरे डाग येण्याचं नेमकं कारण काय असावं ते अजुनही स्पष्ट कळलेलं नाही.
काही तज्ञांच्या मते रोगप्रतिकारशक्तीची ती एक हानीकारक स्थिती आहे.
जेंव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच चुकून त्वचेच्या निरोगी पेशी नष्ट करते, तेंव्हा शरीरावर पांढरे डाग पडतात.
पांढरे डाग अनुवांशिक असतात. जे कुटुंबातील एका व्यक्तीकडून पुढच्या पिढीतल्या व्यक्तीकडे जाऊ शकतात.
थायरॉईड किंवा आणखी काही विकारात सुद्धा ही पांढरे डाग त्वचेवर दिसतात.
पांढरा डाग एकाच ठिकाणी राहील की शरीरभर पसरतील हे नक्की सांगता येत नाही.
पांढ-या डागांमुळं कोणत्याही वेदना होत नाहीत, आरोग्यासाठी कुठलाही धोका निर्माण होत नाही, मात्र याचे मानसिक परिणाम खोलवर होऊ शकतात.
योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार घेऊन या पांढऱ्या डागांची दाहकता कमी करता येऊ शकते, या डागांवर संपुर्ण खात्रीशीर होमिओपॅथीक उपचार आहेत
पांढऱ्या डागांचे प्रकार
कोडाचे प्रकार डागाच्या रंगावर (विरळ किंवा गडद) आणि त्याच्या आकारावर अवलंबून असतात.
1) काही पांढरे डाग किंवा कोड शरीराच्या एका ठराविक भागात दिसतात.
या प्रकारच्या त्वचारोगाला सेगमेंटल विटिलिगो एकाच भागात दिसणारं कोड म्हणतात. हा सहसा तरुण वयात होतो, एक किंवा दोन वर्षांपर्यंत पसरतो आणि नंतर थांबतो.
2) शरीराच्या एकाच भागात किंवा ठराविक भागातील कोड.
या प्रकारच्या त्वचारोगाला स्थानिक म्हणजेच फोकल किंवा लोकलाईज्ड कोड म्हणतात.
3) शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरणारा कोड
पांढ-या डागांच्या सर्वसामान्य प्रकाराला सामान्य कोड, जनरलाइज्ड कोड म्हणतात, ज्यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागावर पांढरे डाग दिसतात आणि ते शरीरभर पसरतात.
कोडाची लक्षणं
शरीरावरच्या त्वचेचा रंग काही ठिकाणी फिका होतो, किंवा त्वचा पांढरी दिसते.
थेट सुर्यप्रकाश त्वचेच्या ज्या भागावर पडतो त्या त्वचेचं जास्त नुकसान होतं.
हात, पाय, दंड ,चेहरा ओठ या भागांत कोड पटकन पसरतो
लक्षणं
1) त्वचेचा रंग फिका पडणे,पांढरा होणे.
2) लहान वयातच डोक्यावरचे, दाढीचे, भुवईचे किंवा पापण्याचे केस पांढरे होणे.
3) नाक आणि तोंडाच्या आतील त्वचेवर अस्तर असलेल्या ऊतीं हलक्या होत जाणं किंवा पांढ-या होणं.
4) डोळ्याच्या आतील थराचा म्हणजे डोळयातील पडद्याचा रंग विरळ होणं.
कोड एकदा शरीरावर दिसायला लागले की ते किती मर्यादेपर्यंत वाढतील ते सांगता येत नाही.
काही वेळा कोणत्याही उपचारांविना ते पसरायचे थांबतात. मात्र हे अगदी क्वचित प्रमाणात घडतं.
ब-याच वेळेला हे कोड किंवा पांढरे डाग वाढत जाऊन संपूर्ण शरीरावर पसरतात.
एकदा हे कोड शरीरभर पसरले की त्वचेचा नैसर्गिक रंग पुन्हा दिसणं जवळपास अशक्य असतं.
पांढरे डाग किंवा कोड का होतात?
केस, त्वचा, ओठ यांना रंग देण्यासाठी रंग, म्हणजे मेलॅनीन निर्माण करणाऱ्या पेशी ज्यांना मेलॅनोसाइट म्हणतात, त्या काम करायचं थांबवतात. मेलॅनीन तयार करत नाहीत. किंवा त्या स्वतः नष्ट होतात, तेव्हा त्वचेवर पांढरे डाग तयार होतात.
या आजारात डाग पडलेल्या त्वचेचा रंग फिकट होतो, पांढरा होतो.
मात्र या पेशी काम करायचं का थांबवतात हे तज्ञांना अजूनही कळू शकलं नाही.
यासाठी काही ठोकताळे बांधले आहेत की कोड कशामुळं होतो.
1) कोड हा एक असा विकार आहे ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या रंगद्रव्य-उत्पादक पेशींना म्हणजे मेलॅनोसाइटना नष्ट करते.
2)कुटुंबात एखाद्या व्यक्तीला कोड असेल तर आनुवंशिकतेमुळं हा रोग होतो.
पांढरे डाग हे कोडच आहेत याचं निदान कसं केलं जातं?
शरीरावरचे पांढरे डाग पाहून डॉक्टर शारीरिक चाचण्या करतात.
आधी सुरु असणाऱ्या औषधांबद्दलची माहिती घेताना काही प्रश्नांच्या आधारे समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात.
1) कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला
कोड आहे का?
2) तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण किंवा शारीरिक आजार आहे का?
3) कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रोगप्रतिकारक शक्तीचा कोणता आजार आहे का?
4) सूर्य किरणांच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला संवेदनशील वाटते का?
5) पांढरे डाग दिसण्यापूर्वी तुम्हाला पुरळ, सनबर्न किंवा त्वचेच्या इतर काही समस्या जाणवल्या का?
6) वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी तुमच्या केसांचा रंग
पांढरा झाला का?
याशिवाय डॉक्टर काही शारीरिक तपासणी सुचवू शकतात, जसं की
रक्त तपासणी
तपासणीसाठी प्रभावित त्वचेचा एक छोटा तुकडा घेणे (बायोप्सी)
डोळयांची तपासणी
पांढरे डाग किंवा कोडावर उपचार
कोडावरील उपचारांमुळे त्वचा सामान्य दिसण्यास मदत होते, पण हे उपचार काही गोष्टींवर अवलंबून असतात
i) शरीरावर पसरलेल्या पांढ-या डागांची संख्या.
ii) पांढरे डाग किती पसरले आहेत किंवा त्यांचा आकार किती मोठा आहे.
iii) बाधित व्यक्तीनुसार उपचार.
अनेक उपचार असे आहेत जे सरसकट प्रत्येकासाठी वापरता येत नाहीत, कारण त्यांचे बरेच दुष्परिणाम असतात.
कधीकधी उपचारासाठी बराच वेळ लागतो.
त्वचारोगाच्या सध्याच्या उपचारांमध्ये कोडासाठी वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया आणि बाकी काही पर्याय उपलब्ध आहेत.
बहुतेक उपचार हे त्वचेचा रंग परत आणण्याच्या दृष्टीने करतात
पांढरे डाग किंवा कोड यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत.
पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार करून घ्या.
पांढरे डाग किंवा कोड हा संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळं ज्यांना हा रोग झाला आहे त्यांनी हिंमत हरु नये, ज्यांना हा रोग झाला नाही त्यांनी मात्र पांढऱ्या डागानं हैराण असलेल्या व्यक्तीला आदरानं वागवावं.
मुलांचे आजारबालकुपोषण
काही केला तरी मुलांचे वजन वाढत नाही / उंची वाढत नाही, जेवत नाहीय का?
मुलांचे आजार
गालगुंड
गोवर
बाळदमा
डांग्या खोकला
माती खाणे
तापाचे झटके
न्यूमोनिया आजार
जुलाब-अतिसार
या सारख्या सर्व आजारावर खात्रीशीर होमिओपॅथीक उपचार
कोणतेही साईड इफेक्ट नाहीत
1 दिवसाच्या बाळापासून ते मोठया लोकांना चालेल अश्या होमिओपॅथीक औषध साठी एकदा भेटा
श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
ऍडेनोईड ग्रंथीवाढ
ऍडेनोग्रंथीचा त्रास तीन ते पाच वर्षे या वयात विशेष असतो. ऍडेनोवाढीची मुख्य खूण म्हणजे मूल श्वासासाठी तोंड उघडे ठेवते.
कोरडा खोकला
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
घटसर्प
लहान मुलांमध्ये घटसर्प नावाचा एक गंभीर आजार येऊ शकतो.
घसादुखी – टॉन्सिलसूज
जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत.
घोरणे
घोरणे हा आजार आहे असे अनेक लोक मानत नाहीत. वयस्कर स्त्री पुरुषांपैकी 20 ते25% लोक झोपेत घोरतात.
घोळणा फुटणे
उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात.
फ्लू (एन्फ्लुएंझा)
हा आजार विषाणूंमुळे होतो. बर्ड फ्लू चे नाव आपण ऐकले आहेच. हा पक्ष्यांना होतो. क्वचित माणसाला होतो.
श्वसनसंस्थेची रचना आणि कार्य
श्वसनसंस्था म्हणजे बाहेरून हवा घेऊन ती असंख्य सूक्ष्म फुग्यांमध्ये खेळवण्याची व्यवस्था आहे.
श्वासनलिकादाह
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे.
सर्दी- पडसे
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्या, सर्व प्रकारच्या व्यक्तींना सर्दी होऊ शकते. हवामान बदलताना अनेकांना सर्दी-पडशाचा त्रास होतो.
सायनसदुखी
नाकाच्या पोकळीच्या वर,बाजूला, मागे आणि मेंदूखाली अशा प्रत्येकी चार-चार पोकळया असतात. त्या नाकाला जोडलेल्या असतात. या पोकळयांनाच सायनस म्हणतात.
अस्थिभंग (हाड मोडणे, फ्रॅक्चर)
हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयात,काही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते.
अस्थिविरळता
अस्थिविरळता म्हणजे हाडांमधील घनता कमी होऊन ती विरळ आणि दुबळी होणे.
गुडघेदुखी
शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते. अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो.
जंतुदोषाने होणारी हाडसूज
त्वचेला व इतर अवयवांना ज्याप्रमाणे जंतुदोष होतो त्याचप्रमाणे हाडे व सांधे यांनाही जंतुदोष होऊ शकतो.
मणक्यांचे आजार : स्पाँडिलायटिस
मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे.
मुडदूस
1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व ‘ड’ कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो.
संधिवात
संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे. यालाच संधिवात म्हणतात. ही एक चयापचयाशी निगडीत समस्या आसून रक्तातील युरीक आम्लाच्या अतिशय उच्च पातळीशी संबंधित आहे.
संधिवाताभ संधिशोथ
संधिवाताभ संधिशोथ म्हणजेच -हुमॅटॉईड आर्थ्रायटीस ही संधींची एक दाहकारक स्थिती असून तिचा प्रारंभ हा सामान्यतः संथ होतो.
संधिशोथ
संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज (असतील किंवा नसतील) निर्माण करणा-या संधिरोगांच्या समूहाचा उल्लेख या नांवाने होतो.
सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस
सर्व्हायकल स्पाँडीलायटिसची लक्षणे म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ .
सांधेसूज
सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले असतील तरच सांधेसूज म्हणता येईल.
हाडांचा कर्करोग
हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत.
आजार शरीराचा त्रास मनाचा!
भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते.
आयुष्यातील तणावपूर्ण घटनांमुळे अनेकदा प्रचंड डोकेदुखी जाणवते, अंग दुखते, विलक्षण थकवा जाणवून आजारी असल्यासारखे वाटते. भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते. पण तो असतो मानसिक आजार.
अ नेक प्रकारची दुखणी वा छोटे-मोठे आजार सगळ्यांना होतच असतात. कधी सामान्य तर कधी दुर्धर, कधी मजेशीर तर कधी कधी चमत्कारिक वाटणाऱ्या दुखण्यांचे अस्तित्व हे माणसाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण अनेक वेळा ही सगळी दुखणी व लक्षणे जरी शारीरिक आजार म्हणून रुग्ण सांगत असले तरी वैद्यकीय शास्त्रातला माहीत असलेला आजार मात्र या रुग्णांमध्ये सापडत नाही. इतकी अनेक प्रकारची लक्षणे असतात की, कुठलाही एक अमुक आजार आहे म्हणून लक्षात येत नाही.
मनात दडलेल्या मानसिक त्रासाचा पूर्ण परामर्श घेऊनच अशा मानसिक आजारांचे निदान केले जाते. यासाठी रुग्णांशी खोलवर संवाद साधणे आवश्यक आहे.

भारती होमिओपॅथीची सुरवात २०१४ मध्ये झाली डॉ. उमा सागर बाटे आणि डॉ. सागर शि. बाटे यांच्या अथक प्रयत्नातून आज त्या झाडाचे वटवृक्षात रूपांतर झाले.
मेनू
संपर्क
care@www.drbatesbhartihomeopathy.com
batesgar333@gmail.com
+91 8626089040
+91 8180800404